व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
सातारा, कराड (प्रतिनिधी: कुलदीप मोहिते)
“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” उपक्रमांतर्गत 2023-24 मध्ये जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवून निळेश्वर माध्यमिक विद्यालय, वडोली निळेश्वर (ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था संचलित) ने 11 लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले. याचा पारितोषिक वितरण सोहळा सातारा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलमध्ये संपन्न झाला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. शंभूराजे देसाई यांच्या हस्ते शाळेचा गौरव करण्यात आला. यावेळी कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर, गटविकास अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
निळेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सचिन नलवडे यांनी सर्व गुरुजन व विद्यार्थ्यांसह हा सन्मान स्वीकारला. या विशेष यशाबद्दल विद्यालयाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ, सचिव तुकाराम नांदुगडे व ग्रामस्थांनी शाळेचे अभिनंदन केले.
शाळेने उपक्रमशीलतेमुळे ग्रामीण भागात नाव लौकिक कमावला आहे, आणि त्यांच्या या यशाने संपूर्ण जिल्ह्यात प्रेरणा निर्माण केली आहे.