शिक्षक पालक समन्वय काळाची गरज …. विक्रम विरकर.

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड… प्रतिनिधी
    सर्व गुणसंपन्न विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षक व पालक यांचा समन्वय ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी विक्रम वीरकर यांनी म्हसवड येथे केले.

   क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात इयत्ता 10वी व 12 वी तसेच शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला होता. प्रमुख पाहुणे म्हणून बिहार भोजपुर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विक्रम विरकर उपस्थित होते,तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर होते. कार्यक्रमासाठी संस्था सचिव सुलोचना बाबर, प्राचार्य विठ्ठल लवटे, प्राचार्य विन्सेंट जॉन, मुख्याध्यापक अनिल माने व पुनम जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

     यावेळी बोलताना जिल्हाधिकारी विक्रम वीरकर म्हणाले उज्वल यश मिळण्यासाठी खडतर परिश्रमाची गरज असते. कोणत्याही परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अभ्यासाच्या वेळेचे नियोजन, सातत्य, जिद्द चिकाटी महत्त्वाचे असते. प्रयत्न केले तर काहीही अशक्य नाही हे क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. देश व राज्य स्तरावरील स्पर्धा परीक्षेचा पाया हा शालेय शिष्यवृत्ती परीक्षेतून घडला जातो. नियमित अभ्यास, अवांतर वाचन मैदानी खेळातील सहभाग यातून सर्व गुणसंपन्न विद्यार्थी घडतो. सचिन तेंडुलकर यांच्या यशस्वी जीवनाचा वृत्तांत सांगून ते भारतरत्न कसे झाले याची तपशीलवार माहिती वीरकर यांनी दिली. अल्पावधीत क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाने केलेल्या सर्वांगीण प्रगती बाबत तसेच विद्यार्थ्यांच्या उज्वल यशाबद्दल विक्रम विरकर यांनी समाधान व्यक्त केले.
    यावेळी त्यांच्या हस्ते इयत्ता 12 वी परीक्षेत उज्वल यश मिळवणारे आयुष पिसे, शुभम खाडे,मोहित खाडे,सुरेश धनवडे,प्रणव पवार, इयत्ता 10 वी मधील सुरेश कापसे, धनराज खाडे, अर्चिता राऊत, अस्मिता गुरव, सीबीएसई इयत्ता दहावी मधील स्नेहा काटकर, ऋग्वेद मंगरूळे, सारंग हेगडे तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणाऱ्या रिया नरळे व श्रेया नरळे या भगिनीचा सत्कार जिल्हाधिकारी विक्रम वीरकर यांच्या हस्ते करण्यात आला.
      प्रस्ताविक मुख्याध्यापक अनिल माने यांनी केले तर सूत्रसंचालन पल्लवी जगताप यांनी केले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!