इंद्रायणी मस्के यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार राज्यस्तरीय शिक्षण पुरस्काराने इंद्रायणी मस्के सन्मानित
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
विजयकुमार ढालपे
गोंदवले-
नवराष्ट्र WOMEN ACHIEVERS राज्यस्तरीय अवार्ड 2023 जगाला प्रेरणादायी पुरस्कार दिनांक 9 सप्टेंबर 2023 रोजी सांगली येथे शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सौ इंद्रायणी मस्के यांना मा. आमदार सुमनताई पाटील, सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. तृप्ती
धोडमिसे, ज्येष्ठ साहित्यिका मा. तारा भवाळकर, व्यवस्थापक मा. राजेश वरळीकर, मा. दिपक पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
नवराष्ट्र तर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान पुरस्कार देऊन केला जातो. इंद्रायणी मस्के यांनी गेली 25 वर्ष अध्यापन करीत असताना शिष्यवृत्ती परीक्षा, मंथन परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा इ. मध्ये अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत आणले आहेत. तसेच वक्तृत्व, निबंध, बुद्धिबळ, नृत्य, बालनाट्य, प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धांमध्ये अनेक विद्यार्थी घडवले आहेत.
शैक्षणिक उपक्रमाबरोबर सामाजिक क्षेत्रात कार्य करताना महिला सबलीकरण, साक्षरता अभियान, स्त्रीभ्रूणहत्या, पाणी फाउंडेशन, महिला हिमोग्लोबिन तपासणी, व्यसनमुक्ती, लोकन्यायालय, वृक्ष माझा सखा इ. उपक्रमात सहभागी घेऊन 197 व्याख्याने व 721 लग्न समारंभ, सभा व सामाजिक कार्यक्रमांमध्ये निवेदन केले आहे. आपल्या अमोघ वाणीने लोकांना मंत्रमुग्ध केले असून वारकरी सांप्रदायाचा वसा घेऊन प्रवचने व किर्तन सेवा दिलेली आहे.
मस्के यांना यापूर्वीही मानपंचायत समितीचा आदर्श शिक्षक पुरस्कार, सातारा जिल्हा परिषदेचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार, दहिवडी नगरपंचायतीचा उत्कृष्ट निवेदिका पुरस्कार, कोल्हापूर तालुका कागल मुरगुड येथील शब्दसम्राज्ञ पुरस्कार, सांगली कवठेमंकाळ पत्रकार संघाचा स्वामी विवेकानंद शब्द साधना पुरस्कार, शिरोळ तालुका खिद्रापूर येथील राज्यस्तरीय माता जिजाऊ पुरस्कार, मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी महाराष्ट्र यांच्यावतीने राज्यस्तरीय कर्तृत्ववान नारी रत्न महिला पुरस्कार मिळालेला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल माणदेश फाउंडेशन अध्यक्षा सौ. अनुराधा देशमुख, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश गंबरे, केंद्रप्रमुख नारायण आवळे यांनी अभिनंदन केले.
छाया – मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्विकारताना सौ.इंद्रायणी जवळ-मस्के.