नवनाथ शिरकुळे यांचा पोलीस अधिक्षक सातारा यांचे कडून प्रशस्ती पत्र देऊन गौरव
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड
सादिक शेख ( पोलीस टाइम्स रिपोर्टर )
गोंदवले खुर्द प्रतिनिधी :
. नवनाथ शिरकुळे हे म्हसवड पो. ठाणे येथे कार्यरत आहेत त्यांनी गु.र.नं. १५४/२०२२ भा.दं.वि.क.३९४.३४ मधील आरोपींचा तांत्रिक पध्दतीने तपास करुन ०४ आरोपींना अटक केले.तसेच सदर आरोपींकडून गुन्हयात चोरीस गेलेला एकुण १४,५८,२३०/- रु.किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आनला . नवनाथ शिरकुळे यांनी म्हसवड पोलीस स्टेशन चे ठाणेदार स.पो.नी.. राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या प्रशंसनीय व सर्वोत्कृष्ट कामगिरीबाबत सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी प्रशंसा पत्र देऊन “हार्दिक अभिनंदन” केले या उल्लेखनिय कामगिरीचा सातारा जिल्हा पोलीस दलास अभिमान वाटतो. तसेच भविष्यात देखील आपण कर्तव्यतत्पर राहून जिल्हा पोलीस दलाची क्षमता व परिणामकारकता वाढविण्यास प्रयत्नशील रहाल असा दृढ विश्वास दाखवला.. नवनाथ शिरकुळे यांचे पोलीस अधिकारी वर्ग, सहकारी व जनतेतून अभिनंदन होत आहे.