पंचक्रोशी दत्त मंदिर विद्यालयात नैसर्गिक कलर कार्यशाळा संपन्न

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला)
कुलदीप मोहिते
कराड, प्रतिनिधी

हेळगाव (ता. कराड) येथील पंचक्रोशी दत्त मंदिर विद्यालयात नैसर्गिक कलर कार्यशाळा संपन्न झाली. विवेकानंद पर्यावरण फौज, गोवा आणि कृष्णा नदी चळवळ, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या वेळी गोव्याचे पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर आणि वनस्पती अभ्यासक सूर्यकांत गावकर यांनी पानाफुलांपासून आणि झाडांच्या बीजांपासून तयार होणाऱ्या नैसर्गिक रंगांचे प्रात्यक्षिक दाखवले. काजू व इतर झाडांपासून तयार केलेले रंग विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवता आले. कृष्णा नदी चळवळीचे पर्यावरणप्रेमी राहुल पवार यांनीही नैसर्गिक रंग तयार करण्याचे मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत पर्यावरणाच्या समतोलासाठी नैसर्गिक रंगांचे महत्त्व आणि केमिकल रंगांमुळे होणारे दुष्परिणाम याबद्दल विद्यार्थ्यांना सखोल माहिती देण्यात आली. देशातील 315 नद्या आणि महाराष्ट्रातील 54 नद्या दूषित असल्याचे सांगत पाण्याची टंचाई, निसर्गाचा ऱ्हास, जागतिक तापमानवाढ आणि नदी संवर्धन यासंदर्भात विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर. सी. पवार होते. उपशिक्षक देशमुख सर, काकडे सर, पाटील, कांबळे सर, रावते मॅडम तसेच कृष्णा नदी चळवळीचे आबासाहेब चव्हाण, विजय जगताप, अशोक सुतार, पत्रकार अनिल मोरे, रूपाली सावंत आणि राहुल पवार उपस्थित होते.

कार्यक्रमात विद्यार्थिनी सानिका जाधव, अनुष्का सूर्यवंशी, सृष्टी जगदाळे, जानवी माने यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक काकडे सरांनी केले, तर आभार कांबळे सरांनी मानले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंगांविषयी आणि पर्यावरण संरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!