बाल विकास प्रकल्प नागरी सातारा पुर्व प्रकल्प अंतर्गत म्हसवड येथे राष्ट्रीय पोषण अभियानाचा उद्घाटन समारंभ संपन्न
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
बाल विकास प्रकल्प नागरी सातारा पुर्व प्रकल्प अंतर्गत म्हसवड येथे राष्ट्रीय पोषण अभियानाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हसवड नगरपालिकेच्या माजी. उपनगराध्यक्षा सौ.स्नेहल सुर्यवंशी मॅडम, नेत्ररोगतज्ज्ञ डाॅ.हेमा पिंजारी मॅडम, डाॅ.मोडासे मॅडम तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी सातारा (नागरी) पुर्व च्या सौ.ज्योती लंगुटे मॅडम, मुख्य सेविका सौ.घोरपडे मॅडम सर्व अंगणवाडीत कर्मचारी व पालकवर्ग उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन फीत कापून तसेच दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर अंगणवाडी सेविकांनी योजनागीत सादर केले. सेविका सय्यद मॅडम यांनी सर्वाचे स्वागत केले. मुख्यसेविका घोरपडे मॅडम यांनी प्रास्ताविक केले,प्रास्ताविकामध्ये चालू वर्षाची पोषण अभियानाची थीम तसेच महिनाभरात घेतल्या कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन केले. डाॅ.मोडासे मॅडम यांनी आहाराविषयी सखोल मार्गदर्शन केले. नेत्ररोगतज्ज्ञ डाॅ.पिंजारी मॅडम यांनी गर्भावस्थेपासून ते बालक सहा वर्षाचे होईपर्यंत बालकांच्या डोळ्यांची काळजी कशा प्रकारे घ्यावी याविषयी सखोल मार्गदर्शन केले. मा.सौ.ज्योती लंगुटे मॅडम यांनी सर्व अंगणवाडी सेविका मदतनिस यांना अभियान उत्कृष्ट राबवण्याकरीता शुभेच्छा दिल्या तसेच सर्व पालकवर्गास अभियानात सहभागी होण्यासाठी अवाहन केले. आभार सेविका अश्विनी फुटाणे मॅडम यांनी केले. यावेळेस सर्व अंगणवाडी सेविका मदतनिस व पालकवर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते .