नामांच्या हरीच चांगभल” च्या गजराने नागोबा मंदिर दुमदुमले.
म्हसवड- नागोबा देवाची मार्गशीर्षच्या पौर्णिमे नंतर 8 डिसेंबर पासून देवाची यात्रा सुरु आहे. बुधवारी देवाची पाकाळणी असल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून सर्व भक्तांनी नागोबाच्या दर्शनासाठी उपस्थिती लावली. भक्तांच्या महापुरांने संपूर्ण मंदिर भंडार्याने व ‘नामाच्या हरीचे चांगभल’च्या जयघोषाने दुमदुमून गेले होते.
पाकाळणी दिवशी संपूर्ण परिसरातील बांधव देवाला पुरणपोळीचा नैवध्य करतात, आणि आपल्या कुटुंबासमवेत आपल्या आराध्याचे दर्शन घेतात. यावेळी श्री ची पालखीतून मिरवणूक काढली जाते. नवसाच्या मुलांना भंडार्या मध्ये व खोबर्या मध्ये अथवा पेढ्यामध्ये जोकण्याची लगबग यात्रेमध्ये सुरु होती.
संपूर्ण लोकांना देवाचे दर्शन व्यवस्थित घेता यावे यासाठी म्हसवड पोलिस स्टेशन व नागोबा देवस्थान ने नेटके नियोजन केल्यामुळे भक्तांना व्यवस्थित दर्शन घेता आले.
पाकाळणी हा नागोबा यात्रेचा मुख्य दिवस असून याच दिवशी यात्रेची सांगता होत असते. पहाटे देवाची पूजा व संपूर्ण परिसर स्वच्छ धुवून संपूर्ण परिसर मंगलमय करण्यात आला होता. यात्रा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी माण तालुका बाजार समितीचे सर्व पदाधिकारी, माण तालुक्यातील वैद्यकीय विभाग, नागोबा देवस्थान ट्रस्ट , म्हसवड नगरपालिका,म्हसवड पोलिस स्टेशन आदीं विभागाच्या सर्व पदाधिकार्यांनी विशेष परिश्रम घेतले.
चौकट –
पोलिस प्रशासनाचे विशेष कौतुक
नागोबा देवाच्या पाकाळणीला दरवर्षीच भाविकांची उलोट गर्दी उसळत असते.त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असते.परंतू चालू वर्षी यात्रेत म्हसवड पोलीस स्टेशनचे सह्याक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ साहेब यांनी विशेष नियोजन करून विशेष बंदोबस्त यात्रेत तैनात केला होता.त्यामुळे भाविकांना वाहतूक कोंडीची व गर्दीची समस्या जाणवली नाही.त्यामुळे पोलिस प्रशासनाचे ट्रस्टी कडून व भाविक भक्तांकडून विशेष कौतुक होत आहे.