म्हसवड येथील पत्रकार व सा. सिध्दनाथ राजयोग चे संपादक नागनाथ डोंबे यांना पितृशोक
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
म्हसवड येथील पत्रकार व सा. सिध्दनाथ राजयोग चे संपादक नागनाथ डोंबे यांचे वडील शंकर (पोपट) जगन्नाथ डोंबे यांचे वृध्दापकाळाने वयाच्या 84 व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.
लिंगायत समाजाचे जुने व जाणते व्यक्तीमत्व म्हणुन शंकर डोंबे यांच्याकडे पाहिले जात होते, ते शहर व परिसरात पोपट या नावाने सुपरिचित होते. गत काही महिन्यांपासुन त्यांची यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते मात्र वृध्दापनामुळे त्यांचे शरीर त्यांना अपेक्षित साथ देत नव्हते त्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. बुधवारी दिवसभरात त्यांची प्रकृती अधिकच बिघडली तर रात्री 8 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुली, मुलगा नागनाथ, सुन व नातवंडे असा मोठा परिवार असुन त्यांच्यावर रात्री उशीरा येथील लिंगायत दफन भुमीमध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला. तर शुक्रवार दि.5 मे रोजी सकाळी ठिक साडे 7 वाजता येथील लिंगायत दफन भुमीमध्ये त्यांचा सावडणे विधी होणार आहे.