नगर परिषद व नगर पंचायत प्रकल्पांबाबत पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड(संपादक:अहमद मुल्ला )

कुलदीप मोहिते (प्रतिनिधी )

कराड;

सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायतींतील विविध प्रकल्पांसंदर्भात पालकमंत्री . ना. शंभूराज देसाई यांनी दिनांक 22 रोजी आढावा बैठक घेतली. जिल्ह्यातील नगर परिषदा व नगर पंचायतींनी केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीसह स्वनिधीचे योग्य नियोजन करून लोकहिताची नाविन्यपूर्ण कामे करावीत, अशी सूचना ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी केली.

याप्रसंगी . ना. शंभूराज देसाई म्हणाले की, सर्व नगर परिषदांनी व नगर पंचायतींनी घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता उपक्रमांवर विशेष भर द्यावा. सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी बांधकाम कामासाठी, उद्यानांसाठी वापरणे बंधनकारक करावे. स्मार्ट शाळा व स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र ही योजना नगर परिषद व नगर पंचायतींमध्ये प्रभावीपणे राबवावी, अशा सूचनाही . ना. शंभूराज देसाई याप्रसंगी केल्या. तसेच महाबळेश्वर येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असून तेथील बसस्थानक नव्याने बांधून वरील दोन मजल्यांवर वाहनतळ व्यवस्था करण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न ६० ते ७० टक्के सुटू शकेल. या प्रकल्पाला टप्प्याटप्प्याने निधीही उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही शंभूराज देसाई यांनी यावेळी दिली. तसेच यापुढे प्रत्येक दोन महिन्यांतून एकदा नगर परिषद व नगर पंचायतनिहाय कामांचा आढावा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, नगर परिषद प्रशासन अधिकारी पल्लवी पाटील यांच्यासह सर्व मुख्याधिकारी उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!