म्हसळा शहरात शिवसेना व गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती उत्सवाचा दिमाखदार सोहळा संपन्न.
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसळा – रायगड
शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसळा तालुका शहरात प्रथमतःच दिघी नाका येथील चौकात राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करून शिवजयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली.प्र.पोलिस निरीक्षक पवन चौधरी यांच्या हस्ते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्याचे पूजन व श्रीफळ वाढवून अभिवादन करण्यात आले.

म्हसळा येथे आयोजित फाल्गुन वद्य तृतीया शके १९४५ तिथीनुसार साजरी करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवात किल्ले दुर्गराज रायगड ते म्हसळा अशी मशाल ज्योत प्रज्वलीत ठेवून,पालखी सोहळा,ढोल ताशाच्या गजरात,झांज पथकाने वाद्य वाजवत, फटाक्यांची आतषबाजी करत राजे छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजीराजे,महाराणी येसूबाई आणि स्वराज्याचे शिलेदारांची वेशभुषा धारण केलेले बालकलाकार यांची रथातून भव्य मिरवणूक पार पडली.त्या औचित्याने चॅम्पियन कराटे क्लब श्रीवर्धन – म्हसळा मधील मुलामुलींनी बनाठी खेळ,ढाल तलवारबाजी प्रात्याशिक आणि विविध चित्त थरारक मनोरे सादर केले


