सोन्याचे दागिणे व रोख रक्कमेची चोरी करण्याकरीता वृध्द महिलांचे खुन करणाऱ्या दोन इसमांना जेरबंद करुन दुहेरी खुनाचा गुन्हा ७२ तासाचे आत उघड
व्हिजन२४ तास न्युज म्हसवड (संपादक: अहमद मुल्ला )
म्हसवड:
पर्यंती ता माण येथील मायलेकीचा दोरीने गळा आवळून खून झाल्याच्या घटनेने संपूर्ण सातारा जिल्हा हादरुन गेला होता या घटनेतील खून्यांच्या ७२ तासात मुसक्या आवळण्यात सातारा पोलीसांना यश आले याबाबत अधिक माहीती अशी
२० डिसेंबर २०२३ रोजीचे रात्रौ ८.०० ते २१ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ०७.०० वा. चे दरम्यान मौजे पर्यंती ता. माण जि.सातारा गावचे हद्दीत राहत असलेल्या १) श्रीमती नंदाबाई भिकु आटपाडकर वय ५८ वर्षे २) श्रीमती संपताबाई लक्ष्मण नरळे वय ७५ वर्षे यांचा कोणीतरी अज्ञात इसमांनी त्यांचे अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने मोबाईल, व रोख रक्कम जबरीने चोरुन नेहण्याकरीता दोघींचा गळा आवळुन खुन केला म्हणून वगैरे मजकुरचे दिले फिर्यादीवरुन म्हसवड पोलीस स्टेशन गु.र.नं. ३९०/२०२३ भादविस कलम ३०२,३९७,३४ प्रमाणे दाखल करण्यात आला होता
सदरची घटना ही अतिशय गंभीर असल्याने श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती अश्विनी शेंडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग दहिवडी, पोलीस निरीक्षक, अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सपोनि शिवाजोरात्र विभुते म्हसवड पोलीस स्टेशन यांनी गुन्ह्याचे घटनास्थळी भेट दिली. श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा तसेच श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेवुन सदरचा गुन्हा उघडकीस आणणेच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे त्यांनी सपोनि रविंद्र भोरे स्थागुशा, पोउनि विश्वास शिंगाडे स्थागुशा, पोउनि पतंग पाटील स्थागुशा सातारा व सपोनि शिवाजीराव विभुते, म्हसवड पोलीस स्टेशन यांचे अधिपत्याखाली तपास पथके तयार करुन तपास पथकास गुन्हा उघडकीस आणणेच्या सुचना दिल्या.
(संदीप शेषमणी पटेल वय वर्ष ३० वर्ष राहणार परसिधी करोल खुर्द सिधी सिहवालं मध्य प्रदेश .)
तपास पथकाने गुन्हा घडलेपासुन घटनास्थळावर हजर राहुन सर्वप्रथम आजुबाजुचे साक्षिदार यांचेकडे विचारपुस करुन माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु घडले प्रकाराबाबत काही एक माहिती मिळून येत नव्हती. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने तपास पथक सर्वतोपरी प्रयत्न करीत होते.
(अजित कुमार रामकिशोर पटेल वय -२९ रा.परसिधी करोल खुर्द सिधी सिहवालं मध्य प्रदेश .)
दि. २४/१२/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना त्यांचे विश्वसणीय गोपणीय बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली की, परराज्यातील असणारा रहिवासी व सध्या पर्यंती ता. माण जि.सातारा गावात राहणारा जे.सी.बी. चालक संदीप शेषमणी पटेल वय वर्ष ३० वर्ष राहणार परसिधी करोल खुर्द सिधी सिहवालं मध्य प्रदेश व त्याचा साथीदार अजित कुमार रामकिशोर पटेल वय -२९ रा.परसिधी करोल खुर्द सिधी सिहवालं मध्य प्रदेश या दोघांनी मिळून सोन्याचे दागिणे व पैशासाठी श्रीमती नंदाबाई भिकु आटपाडकर वय ५८ वर्षे , श्रीमती संपताबाई लक्ष्मण नरळे वय ७५ वर्षे या दोन महिलांचा खुन केला आहे. सदरची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी तपास पथकांना नमुद इसमांचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या. तपास पथकांनी पर्यंती ता. माण गावचे परिसरात व आजुबाजुचे परिसरात प्राप्त माहितीतील इसमांचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे नमुद गुन्ह्याचे अनुशंगाने सखोल व कौशल्यपूर्ण विचारपुस केली असता त्यांनी सदचा गुन्हा सोन्याचे दागिणे व पैसे मिळवण्याकरीता केला असल्याचे सांगीतल्याने सदरचा दुहेरी खुनाचा गुन्हा ७२ तासाच्या आत उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना यश प्राप्त झाले आहे.