म्हसवड – म्हसवड येथे श्रीयाळषशष्टी निमित्त भरवण्यात आलेल्या कुस्ती मैदानात गणेश कुंकूले पिंपरी विरुद्ध मुन्ना झुंझूरके पुणे यांच्यात अंतिम लढत होऊन गणेशवर मुन्नाने आकडी डावावर विजय मिळवत लाखांचा मानकरी ठरला. माजी नगराध्यक्ष श्रीमंत अजितराव राजेमाने यांच्या नेतृत्वाखाली श्रीयाळशष्टी निमित्त येथील माण नदीपात्रात कुस्त्यांचे जंगी मैदान पार पडले. या मैदानात राजाराम रुपनवर म्हसवड विरुद्ध अक्षय तांबे कोल्हापूर यांच्यात लक्षवेधी लढत होऊन प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी कुस्ती शेवटी बरोबरीत सोडविण्यात आली. विनायक दिडवाघ दिडवाघवाडी विरुद्ध यश बाजारे सातारा यात विनायक दिडवाघने एकछाक डावावर विजय मिळवला. गणेश जाधव म्हसवड विरुद्ध सुरज पाटील सांगली याने निकाल डावावर आस्मानी दाखवले म्हसवड परिसरातील विशाल रुपनवर, अक्षय मासाळ, रोहण गायकवाड, शिवाजी मासाळ, अक्षय दिडवाघ, विशाल राजगे, बाॅबी गायकवाड, अक्षय रुपनवर यांच्या कुस्त्या प्रेक्षणीय ठरल्या.
कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी तेजसिंह राजेमाने, नारायण मासाळ, दत्तात्रय केवटे,लिंगाप्पा सारुख, राजेंद्र माने, संजय म्हेत्रे, गंगाराम माने, दादा पाटील, चंद्रकांत केवटे, नाना कोले, शंकर चव्हाण, बंडू केवटे, कांता ढाले, प्रशांत माने, तानाजी निकम, प्रथमेश शेटे यांनी विशेष परिश्रम घेतले. तर मैदान यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पै. बाबासाहेब माने,पै. पोपट रुपनवर, पै. रावसाहेब कोळपे,पै. विलास रुपनवर, पै. श्रावन पडळकर, पै राघू विरकर, पै नाना जाधव , पै तानाजी विरकर, बिरा गोरड यांनी यशस्वीपणे वस्ताद म्हणून काम पाहिले. तर यांचेसह रावसाहेब मगर, शिवाजी दिडवाघ, लालासाहेब दिडवाघ, बाळासाहेब काळे, संजय दिडवाघ, अशा तालुक्यातील अनेक वस्तादांनी काम पाहिले. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जिल्ह्यातील अनेक नामवंत पैलवानानी चटकदार कुस्ती करुन प्रेक्षकांची वाहवाहा मिळवली. तर कुस्त्या पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.