मुंबई बाजार समिती घोटाळा शशिकांत शिंदे यांच्या वरती नरेंद्र पाटलांचा कराड येथील पत्रकार परिषदेमध्ये खळबळ जनक आरोप……..

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते
कराड:प्रतिनिधी

      सातारा जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापले आहे आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत इच्छुक उमेदवार आणि व जाहीर उमेदवारांनी संपर्क दौरे सुरू केले आहेत कराड तालुका व पाटण तालुका निर्णायक भूमिका घेऊ शकतो यामुळे या ठिकाणी जनसंपर्क वाढवला आहे आज कराड येथील अलंकार हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर नरेंद्र पाटील यांनी महेश शिंदे यांनी केलेले आरोप खरे आहे त्यांना मुंबई बाजार समिती घोटाळ्यात जामीन मिळाला आहे असा खळबळ जनक आरोप केला आहे

     ते म्हणाले की माथाडी कामगाराच्या फूट पाडण्याचे काम सुरू आहे विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढल्या पाहिजे पक्षाने आदेश दिला तर आपणही लढू शकतो साताऱ्यात चाचणीमध्ये नावे चर्चात होती त्यामध्ये प्रत्येकाला वाटतं की आपण उमेदवार असावं लोक संपर्क आणि पक्षाला योग्य वाटेल व युतीला योग्य वाटेल तो उमेदवार असू शकतो त्यामुळे पक्ष जो आदेश देईल त्याचं पालन आम्ही करू शशिकांत शिंदे यांच्यावर मुंबई बाजार समिती घोटाळा प्रकरणी आरोप पत्र आहे व त्यांना जामीन मिळाला आहे असा खळबळ जनक आरोप नरेंद्र पाटलांनी केला ते म्हणाले की माथाडी कामगार निर्णायक भूमिका घेऊ शकतो परंतु माथाडी कामगार पुन्हा एकट्याची प्रॉपर्टी नाही सर्वसामान्य कामगारांचे प्रश्न जो सोडवील त्याच्या पाठीशी माथाडी कामगार खंबीर उभे राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!