कु. तेजल दोशी हिचा अहिंसा परिवारातर्फे गौरवपूर्ण सत्कार चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत उज्वल यश
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड : प्रतिनिधी
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत कु. तेजल प्रज्योत दोशी हिने चार्टर्ड अकाउंटंट (CA) या अत्यंत कठीण व स्पर्धात्मक परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल अहिंसा परिवारातर्फे भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
या प्रसंगी अहिंसा पतसंस्थेचे कुटुंबप्रमुख व म्हसवड नगरीचे माजी नगराध्यक्ष नितिन भाई दोशी यांनी कु. तेजल हिला तिरंग्याची प्रतिकृती, शाल व भेटवस्तू देऊन सत्कार केला. यावेळी तिच्या आई सौ. दिपाली दोशी, आजोबा श्री. सुरेश गांधी, मामा श्री. सचिन गांधी यांसह संस्थेचे व्यवस्थापक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कार सोहळ्यात बोलताना नितिन भाई दोशी म्हणाले, “चार्टर्ड अकाउंटंट ही परीक्षा केवळ बुद्धिमत्ता नव्हे तर सातत्यपूर्ण परिश्रम, आत्मविश्वास आणि शिस्त यांची परिक्षा असते. तेजलने हे यश संपादन करून म्हसवडच्या नावाला राज्यात आणि देशात गौरव मिळवून दिला आहे.”
कु. तेजल हिने या यशाचे श्रेय आपल्या कुटुंबीयांचे मार्गदर्शन, गुरूंचे शिक्षण व स्वतःच्या मेहनतीला दिले. “हे यश मिळविण्यासाठी सततचे नियोजन, प्रामाणिक प्रयत्न आणि वेळेचे योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे,” असे तीने सांगितले.
सोहळ्याच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी तेजल हिचे कौतुक केले व तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.