गोंदवले खुर्द येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ.रेश्मा सत्यवान शिलवंत व वृक्षारोपन ,जलसंधारण करणा-या कु.रक्षिता शंकर बनसोडे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
विजयकुमार ढालपे  प्रतिनिधी
गोंदवले
गोंदवले खुर्द येथील सौ.रेश्मा सत्यवान शिलवंत यांनी बचत गटाच्या माध्यमातुन दुष्काळ मुक्ती,आरोग्य,शैक्षणिक गुणवत्ता,महिला सबलीकरण,पोलिसांना प्रोत्साहन,अनेक गावातील पिडीत महिलांना मदत असे अनेक उपक्रम अनेक वर्षापासून राबवित आहेत. तसेच कु.रक्षिता शंकर बनसोडे हिने गावच्या उजाड रानमाळावर अनेक वृक्षांची लागवड करून त्यांचे सवंर्धन केले आहे व करत आहे त्यामुळे सदर दोघींची निवड ही त्याच्या कार्याची पोहच पावती आहे.
     यावेळी बोलताना सरपंच सौ.सिंधु गाढवे म्हणाल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र  राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा उपक्रम सुरू केला आहे हा पुरस्कार मिळविण्यासाठी महिलांमध्ये सामाजिक कामांची चढाओढ लागून गावाच्या विकासासाठी मोठी मदत होईल.
    उपसरपंच अमोल पोळ म्हणाले गोंदवले खुर्द गावची शान उचंविण्याचे काम गावातील या दोन महिलांनी आदर्श काम कले आहे त्यामुळे त्यांची निवड झाली आहे सामाजिक कामासाठी महिलांना नेहमीच सहकार्य राहिल.
    सदर कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य साहेबराव शेडगे,विजय आवघडे,सौ.रूपा शिलवंत,दिलीप हिरवे,सौ.सोनालीआवघडे,सौ.वनित कदम सौ.सुरेखा पोळ तसेच माजी सरपंच सौ.उल्का कदम व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.विजय आवघडे यांनी केले तर ग्रामसेवक शरद जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!