वैष्णवी कुंभार हिला राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळाले असून तिची राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड करण्यात आली आहेसातारा जिल्हा अमॅच्युअर तायक्वांदो असोसिएशन व एपी स्पोर्ट्स अकॅडमी आगाशिवनगर ता कराड ची खेळाडू कु. वैभवी चेतन कुंभार हिने नाशिक येथे झालेल्या तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र च्या अंतर्गत राज्यस्तरीय तायक्वांदो जुनियर चॅम्पियनशिप मध्ये फ्री स्टाईल पुमसे प्रकारामध्ये सुवर्णपदक प्राप्त केले, व तिची जयपूर राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे,
तिला प्रशिक्षक म्हणून.अक्षय खेतमर यांचे मार्गदर्शन लाभले तर कराड तालुका अध्यक्ष .अमोल पालेकर यांचे मार्गदर्शन बहुमूल्य सहकार्य मिळाले तिच्या या अभिनंदनइय निवडीबद्दल समाजाच्या विविध स्तरातील मान्यवरांकडून तिचे अभिनंदन होत आहे . तसेच सातारा जिल्हा अमॅच्युअर तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सुनील कोडगुले सरचिटणीस .संतोष सस्ते, सचिव .विजय खंडाईत, खजिनदार .गफार पठाण या सर्वांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत