सौ. सोनिया जयकुमार गोरे यांच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

बातमी Share करा:

सौ. सोनिया जयकुमार गोरे यांच्या सभेला उत्स्फूर्त                                     प्रतिसाद
थेटचे नगराध्यक्षपदाची उमेदवार पूजा वीरकर, प्रभाग ५ मधील श्रीदेवी पिसे व प्रज्योत कलढोणे यांच्या प्रचारार्थ सभा

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड

थेटचे नगराध्यक्षपदासाठीच्या उमेदवार पूजा सचिन वीरकर तसेच प्रभाग क्र. ५ मधील श्रीदेवी पिसे व प्रज्योत कलढोणे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला सौ. सोनिया जयकुमार गोरे यांनी मार्गदर्शन करताना म्हसवड शहराच्या सर्वांगीण विकासाचे स्पष्ट व्हिजन मांडले.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष नितीनशेठ दोशी, विजय धट, म्हेत्रे,युवराज सूर्यवंशी, किरण कलढोणे, विकास गोंजारी,विनोद रसाळ, संजय भागवत आदी मान्यवर उपस्थित होते

यावेळी बोलताना सौ. गोरे म्हणाल्या की, “म्हसवडचा विकास चांगल्या पद्धतीने करायचा असेल तर या वेळेस आम्ही तरुणांना संधी देण्याचा निर्णय घेतला. उमेदवारांची मुलाखत, त्यांच्या क्षमतेचा अभ्यास, जनमानसातील प्रतिमा आणि विकासाची दृष्टी या सर्वांचा विचार करूनच आम्ही उमेदवारांचे निवड केली. भाऊंसमोर सर्वांचा सर्वे ठेवला असता जनतेतून ज्यांच्यावर विश्वास आहे अशा उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली.”

त्यांनी स्पष्ट केले की या उमेदवारांना म्हसवडकरांनी मोठ्या प्रमाणात स्वीकारल्याने अर्धी निवडणूक जिंकल्याचा विश्वास निर्माण झाला आहे.

सौ. गोरे म्हणाल्या की, मागील प्रशासकीय काळात अनेक कामे रखडली होती. मात्र भाऊ मंत्री झाल्यानंतर परत गेलेला निधी परत आणत विकासकामांना गती दिली.

८० कोटींची नळ पाणीपुरवठा योजना सुरू — लवकरच शहराला २४ तास पाणी मिळणार.,नदीला १२ महिने पाण्याची सोय

सुंदर गार्डन पुनर्वसनाची कामे सुरू — पूर्वी राज्यातील विविध भागातून लोक पाहायला येत; आता ते अधिक आधुनिकरित्या उभे राहणार.

अनेक रस्त्यांची कामे पूर्ण, काही प्रलंबित कामांना गती

त्यांनी सांगितले की, “भाऊंच्या दृष्टीकोनातून म्हसवडला साताऱ्यासारख्या आधुनिक शहराचा दर्जा द्यायचा आहे. स्वप्नातली नगरी हा आमचा ध्यास आहे.”

मतदानात ‘कमळ’चे बटन दाबण्याचे आवाहन

सौ. गोरे यांनी स्पष्टपणे सांगितले की नगराध्यक्ष थेट निवडून न आला तर प्रशासनावर पकड ठेवणे कठीण असते.
त्या म्हणाल्या,
“विरोधक भावनिक आवाहने करतील, पण कमळाचे बटन दाबणे हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे. मतदानाची पद्धत, कोणता नंबर, कोणते बटन — हे घराघरात जाऊन नागरिकांना समजवा.”

पूजा वीरकर या सुशिक्षित, बी.कॉम पदवीधर असून शहराच्या पुढील वाटचालीसाठी सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले.

इतिहास घडवण्याची वेळ” — नागरिकांना शेवटचे आवाहन

सौ. गोरे म्हणाल्या,
“भाऊंकडे ग्रामविकास खात्याचे मंत्रीपद आहे, याचा मोठा फायदा म्हसवडला मिळणार आहे. ही संधी गमावू नका. आपल्या बहिणी, आपल्या मैत्रिणी पदावर जात आहेत — त्यांच्या मार्फत आपण शहराचा विकास करणार आहोत. इतिहास घडवूया.”

सभेनंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता व उत्साह पाहायला मिळाला.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *