सातारा जिल्हा पोलीस पाटील संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर सौ. हर्षदा अजित शिर्के-पाटील यांची महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
सातारा/प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील पोलीस पाटील संघटनेची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, सौ. हर्षदा अजित शिर्के-पाटील (भाटकी) यांची सातारा जिल्हा महिला आघाडी (महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील ) संघाच्या जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील महिला पोलीस पाटील बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारी पदग्रहण व मार्गदर्शन सोहळा मंगळवार, दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता अलंकार हॉल, पोलीस करमणूक केंद्र, सातारा येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे : श्री. संतोष पाटील, जिल्हाधिकारी सातारा
श्री. तुषार जोशी, जिल्हा पोलीस अधीक्षक
डॉ. वैशाली कडूकर, अप्पर पोलीस अधीक्षक, सातारा अध्यक्षस्थानी : श्री. बाळासाहेब शिंदे, अध्यक्ष – गावकामगार पोलीस पाटील संघ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघ गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस पाटील यांच्या विविध मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. गावपातळीवर पोलीस पाटील यांची कामगिरी अधोरेखित करून त्यांना योग्य स्थान मिळावे यासाठी सातत्याने लढा दिला जात आहे. नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून या लढ्याला आणखी बळ मिळणार आहे.

सातारा जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील सर्व महिला पोलीस पाटील यांच्यातून सौ. हर्षदा शिर्के-पाटील यांची एकमताने व बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्या नेतृत्वाला जिल्हाभरातून व्यापक पाठिंबा मिळाला आहे.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील बंधू-भगिनी, पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सौ. हर्षदा अजित शिर्के-पाटील यांनी केले आहे. उपस्थित मान्यवर व पोलीस पाटील बांधवांचा यथोचित सत्कार करण्यात येणार असून, कार्यक्रमानंतर गोड स्नेहभोजनाचाही मनमोहक कार्यक्रम आयोजित केला आहे.
सौ. हर्षदा शिर्के-पाटील :-
“पोलीस पाटीलांच्या विविध प्रश्नांवर शासन पातळीवर तोडगा निघावा यासाठी मी माझ्या कार्यकारिणी सोबत अहोरात्र प्रयत्न करणार आहे. जिल्ह्यातील सर्व महिला पोलीस पाटील यांचा विश्वास आणि सहकार्य हीच माझी खरी ताकद आहे,” असे निवडीनंतर त्या म्हणाल्या.

