श्री. नागोबा देवाच्या यात्रेला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सौ. सोनिया जयकुमार गोरे यांनी घेतले देवदर्शन व दिल्या शुभेच्छा

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

म्हसवड :प्रतिनिधी
माण तालुक्यातील धनगर समाजाचे आराध्य दैवत लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री नागोबा देवाच्या वार्षिक यात्रेनिमित्त लाखो भाविकांनी उत्साहाने हजेरी लावली. श्री सिद्धनाथ पतसंस्थेच्या संचालिका सौ. सोनिया जयकुमार गोरे (वहिनीसाहेब) यांनी नागोबा देवाचे दर्शन घेतले व भाविक भक्तांना शुभेच्छा दिल्या.

यात्रेनिमित्त भाविकांशी संवाद साधताना सौ. गोरे यांनी पारंपरिक श्रद्धा व संस्कृती जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. यात्रेच्या ठिकाणी ग्रामस्थ व भक्तांचे योगदान कौतुकास्पद असल्याचे त्या म्हणाल्या.

यावेळी म्हसवड नगरीचे माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, बाळासाहेब पिसे, युवानेते विशाल बागल, करण पोरे तसेच यात्रा कमिटीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!