व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) म्हसवड–
श्री. म्हंकाळेश्वर विद्यालय, धुळदेव येथे इयत्ता १०वी एस. एस. सी. बोर्ड परीक्षेचा निकाल अत्यंत उत्साहवर्धक ठरला असून, विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे.
कु. श्रेया रामचंद्र लोखंडे आणि कु. तृप्ती तुकाराम मासाळ यांनी 86.20% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्री. पावरा सर, धुळदेव वर्गशिक्षिका सौ. जयश्री पवार (मॅडम) तसेच गावाचे सरपंच, सर्व ग्रामस्थ, विद्यालयाचे सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.
— या निकालात विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन १००% निकाल मिळवण्याचे श्रेय विद्यालयातील शिक्षकांच्या अथक प्रयत्नांना आणि विद्यार्थ्यांच्या कष्टांना जाते.