गॅस ग्राहकांसाठी महत्वाची सूचना – सावध रहा, फसवणूक टाळा:करणभैया पोरे
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड (प्रतिनिधी): माण खटाव तालुक्यात आणि परिसरातील काही महिला व पुरुष सेल्समन गॅस मीटर आणि गॅस पाईप हाय प्राईसमध्ये विक्री करत आहेत. हे सेल्समन आयएसआय मार्क असलेले गॅस मीटर, जे खरेदी केले असल्याचे सांगून 2 ते 3 हजार रुपयांमध्ये विकत आहेत, मात्र त्यात कारण नसताना किंमत वाढवली जात आहे. याशिवाय, गॅस पाईपची वास्तविक किंमत 190 रुपये असताना ती 500 रुपये किंमतीत विकली जात आहे.
यासंबंधी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकारच्या मीटरचा वापर केल्यास घरात कोणत्याही अपघाताच्या घटनेत गॅस कंपनीकडून नुकसान भरपाई मिळणार नाही आणि ग्राहक स्वतः जबाबदार ठरतील. जर हे उपकरणे मान्यता प्राप्त असले तर सर्व गॅस कंपन्यांनी त्या उपकरणांची विक्री केली असती.
गॅस धारकांना इन्शुरन्सचा दाखला देऊन काही सेल्समन दिशाभूल करतात आणि ग्राहकांना नकली सर्टिफिकेटसह वस्तू विकतात. अशा परिस्थितीत ग्राहकांनी अधिकृत गॅस वितरकांकडूनच वस्तू खरेदी करण्याचे आवाहन करणाऱ्या शुभम भारत गॅस एजन्सीच्या करण भैय्या पोरे यांनी सांगितले की, गॅस एजन्सीचे नाव घेऊन गंडा घालणाऱ्यांना थांबवा आणि त्या एजन्सीशी संपर्क साधून खात्री करूनच खरेदी करा.
गॅस ग्राहकांनी विना कारण पैसे वाया घालवू नका आणि आपल्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या. सतर्क रहा, सुरक्षित राहा!