व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) म्हसवड: माण तालुक्याचे सुपुत्र उरमोडी जिहे- कटापूर सिंचन योजनांचे जनक स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारे यांच्या उभारण्यात आलेल्या स्मारकाचे पुतळा अनावरण रविवार दिनांक 7 जुलै रोजी वडजल ता.माण येथे राष्ट्रीय नेते खा. शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असल्याची माहिती फ्युचर फर्स्ट फाउंडेशनचे संस्थापक अभय धोंडीराम वाघमारे यांनी दिली. वडजल ता. माण जि. सातारा येथे स्वर्गीय आमदार धोंडीरामजी वाघमारे यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारे यांनी तत्कालीन युती शासनाला मान तालुक्याचा दुष्काळ कायमचा हटवण्या साठी उरमोडी व जिहे कटापूर या सिंचन योजनांना प्रशासकीय मान्यता देण्याच्या अटीवर बिनशर्त पाठिंबा दिला होता या पाठिंबाच्या जोरावर त्यांनी माण तालुक्याला सुजलाम सुफलाम करणाऱ्या व भावी पिढ्यां दुष्काळमुक्त करण्यासाठी दूरदृष्टी ठेवून वरील दोन्हीही सिंचन योजनांना प्रशासकीय मंजुरी मिळवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून माणचा दुष्काळ कायमचा मिटविण्यासाठी दूरदृष्टी ठेवून वर्षानुवर्षीचा प्रश्न सोडवला होता त्याचबरोबर माण तालुक्यामध्ये विकास कामांचा डोंगर उभा करण्याचे काम स्वर्गीय वाघमारे यांनी केले होते त्यांनी दुष्काळी माण तालुक्याचे दोन्हीही वेळा अपक्ष आमदार म्हणून लोकप्रतिनिधित्व करत माणवासी यांच्या सुखात दुखात नेहमीच सहभागी झाले होते त्यांचे भावी पिढीला स्मरण व्हावे या हेतूने त्यांच्या मूळ गावी वडजल येथे स्मारक उभारले असून त्यामध्ये त्यांच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रीय नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते व यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे
यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील,माजी मंत्री बाळासाहेब पाटील,माजी मंत्री शशिकांत शिंदे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार मदन दादा भोसले, माजी आमदार तुकाराम तुपे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माण खटाव राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, म्हसवडचे माजी नगराध्यक्ष श्रीमंत अजितराव राजेमाने, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य रणजीत सिंह देशमुख, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई,सातारा जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख शेखर भाऊ गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप, म्हसवडचे माजी नगराध्यक्ष विलासराव माने आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमास माण -खटाव फलटण तालुक्यांसह सातारा जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते राजकीय सामाजिक शैक्षणिक साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान फ्युचर फर्स्ट फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभय धोंडीराम वाघमारे यांनी केले आहे