माणगंगा नदीवरील पुलावर मोटारसायकल अपघात ;  एक ठार  

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
  म्हसवड 
        म्हसवड गावच्या हद्दीत सातारा ते पंढरपूर जाणारे रोडवर असलेल्या माणगंगा नदीवरील पुलाचे लगत असलेले फूटपाथवर  विशाल वस्ताद दोलताडे वय 26 वर्ष राहणार भाटकी तालुका माण जिल्हा सातारा हा रात्री साडे आकरा   वाजणेच्या दरम्यान मोटरसायकल  वरून घरी येत असताना पुलावरील फुटपाथवर जोरात धडकून पडल्यामुळे गंभीर जखमी होऊन जागेवरच मयत झाला 
या अपघाताबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहीती अशी
विशाल वस्ताद दोलताडे वय 26 वर्ष राहणार भाटकी तालुका माण  जिल्हा सातारा हा दि १८/८/ २३ रोजी रात्री साडे आकरा  वाजणेच्या दरम्यान  आपल्या हिरोहोंडा  मोटार सायकल   क्रमांक एम एच 13 सी इ 7261 वरून   घरी जात असताना
 रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्याच्या ताब्यातील मोटरसायकल वेगाने चालवून  हाय गईने अविचाराने चालवून अपघात करून स्वतःचे गंभीर दुखापतीस व मृत्यूस कारणीभूत झाला  असल्याची फिर्याद मयताचा  चुलत भाऊ  इतिहास काशिलिंग दोलताडे वय – 26 वर्षे रा. रांजणी ता फलटण जि सातारा याने म्हसवड पोलीस ठाण्यात दिली  त्यानुसार अपघाताची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सपोनि राजकुमार भुजबळ यांचे मार्गदर्शनाखाली   पोलीस हवालदार जाधव  करत आहेत

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!