म्हसवड येथे एक लाखाहून अधिक संख्येने वारकरी मुक्कामी

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

सलीम पटेल
म्हसवड :

पंढरपुर येथील आषाढी एकादशी निमित्त सातारा – पंढरपुर या रस्त्यावर श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पादुकासह गावोगावच्या सुमारे तीस हून अधिक संख्येने वारकरींच्या पायी चालत आलेल्या दिंड्याचे आज सायंकाळी म्हसवड येथे मुक्कामी आगमन झाले आहे.
यंदा प्रथमच विक्रमी संख्येने या दिंड्यात वारकरी मंडळी सहभागी झाल्यामुळे या दिड्यांतील वारकरी मंडळींची सुमारे दहा किलोमिटर लांबीची रांग पाहण्याचा अनुभव म्हसवड नगरीतील नागरिंकांनी अनुभवला.
     सुमारे एक लाखाहून अधिक संख्येने म्हसवड येथे मुक्कामी राहिल्यामुळे येथील नागरिकांनी या वारकर-यांची मुक्कामासह सकस भोजणाची व पिण्याच्या पाण्याची सुविधा केली असुन येथील मेडीकल असोशिएशन तर्फे डॉक्टरांचे पथक मोफत उपचारासाठी वारकरी मंडळीची रात्रदिवस सेवेत सहभागी झाले आहेत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!