म्हसवड मध्ये वास्तूशांतीच्या जेवणात शंभरपेक्षा अधिक जणांना विषबाधा ; रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु

बातमी Share करा:


व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड

     माण तालुक्यातील म्हसवड येथील शिक्षक कॉलनी परिसरात एका नूतन बंगल्याचे वास्तुशांती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमानंतर अनेकांना उपस्थितांना जेवण देण्यात आली. मात्र जेवल्यानंतर गावातील जवळपास अनेकांना मळमळ , उलटी व जुलाबाचा त्रास सुरू झाला.

      अंदाजे १०० ते १५० जणांना या जेवणातून विषबाधा झाली असून त्या सर्वांना म्हसवड येथील शासकीय रुग्णालय , व तीन चार खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना विषबाधा झाल्याने म्हसवडसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की म्हसवड येथे सोमवार दि १० जून रोजी एका नूतन घरच्या वास्तुशांतीचे जेवण जेवल्यानंतर सुमारे १०० ते १५० लोकांना विषबाधा झाली त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेमुळे सर्वांची चांगलीच तारांबळ उडाली.

     वास्तुशांतीच्या ठिकाणी जेवण केल्यानंतर सुरुवातीला काही लोकांना मळमळ, उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला.


       काही वेळानंतर बऱ्याच लोकांना एकसारखाच त्रास व्हायला सुरुवात झाल्याने संबंधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी म्हसवडमधील चारही खाजगी दवाखान्यात रुग्णांना जागा देखील उपलब्ध नव्हती,अशी माहिती घटनास्थळावरून मिळली आहे. यावेळी काही रुग्णांना १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजत आहे.सरकारी दवाखान्यात देखील काही बाधित रुग्णांनी उपचार घेतले.

      याबाबत पत्रकारांनी माण पंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ लक्ष्मण कोडलकर यांच्या दुरध्वनी वरुन संपर्क साधावा असता सदर घटनेला दुजोरा दिला आहे. सदरच्या घटनास्थळावर माणचे तहसीलदार विकास अहिरे , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ लक्ष्मण कोडलकर व म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी प्रत्यक्ष रुग्णांची चौकशी करून घटनास्थळीची पाहणी करून ज्या अन्नातून विषबाधा झाली ते अन्नाची सॅपल पुणे येथे पाठविले आहे.
       दरम्यान म्हसवडमध्ये झालेल्या विषबाधा प्रकारची संपूर्ण माण तालुक्यासह सातारा जिल्ह्यात चर्चा सुरू


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!