मोहन जोशी यांना ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान…
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
गणेश तळेकर
मुंबई :प्रतिनिधी
मराठी नाट्य कलाकार संघातर्फे ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी यांना यंदाचा ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ एका शानदार सोहळ्यात प्रदान करत त्यांचा सन्मान करण्यात आला. मराठी नाट्य कलाकार संघातर्फे ‘जागतिक रंगकर्मी दिवस’ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात मोहन जोशी यांना उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात सन्मानमूर्ती मोहन जोशी यांची प्रकट मुलाखत रंगकर्मी विघ्नेश जोशी यांनी घेतली. ज्ञानेश पेंढारकर यांचा सांगीतिक कार्यक्रमही यावेळी सादर झाला.


