मनसे विद्यार्थी सेनेच्या लढ्याला यश अखेर महाविद्यालयातील प्राध्यापकाची सेवा 24 तासात समाप्त

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला 

कुलदीप मोहिते उंब्रज कराड

सातारा जिल्ह्यातील उंब्रज येथील महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या विकृत प्राध्यापकावर कारवाई करण्यासाठी अमोल सुभाष कांबळे यांनी पुकारलेल्या आंदोलनाला मोठे यश आले असून. मनविसेच्या आक्रमक इशाऱ्याची दखल घेत महाविद्यालय प्रशासनाने अवघ्या २४ तासांत संबंधित प्राध्यापकाची सेवा तात्काळ समाप्त केली आहे.

सदर महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवून तिचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली होती. याप्रकरणी पोलीस तक्रार होऊनही महाविद्यालय प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नव्हती. या अन्यायाविरुद्ध मनविसेचे सातारा जिल्हा सचिव . अमोल सुभाष कांबळे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला २४ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला होता. कारवाई न झाल्यास ‘मनसे स्टाईल’ तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.

मनविसेच्या आक्रमक पवित्र्यामुळे संबंधित संस्थेने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. संबंधित संस्थेचे सहसचिव (उच्च शिक्षण) यांनी आज अधिकृत पत्र काढून संबंधित प्राध्यापकाची नियुक्ती रद्द करून त्याला संस्थेतून बडतर्फ (Relieve) केल्याचे आदेश दिले आहेत.

या यशस्वी लढ्यात मनविसेचे जिल्हा सचिव अमोल कांबळे, शहर अध्यक्ष विजय वाणी, पारस प्रभाळे, शिवराज जाधव, तेजस शिंदे, शुभम भिंगारदेवे आणि इतर कार्यकर्त्यांनी मोलाची भूमिका बजावली

*चौकट*
*”विद्यार्थिनींच्या सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही नराधमाला मनविसे सोडणार नाही. हा केवळ एका प्राध्यापकावर झालेली कारवाई नसून, अशा प्रवृत्तींना दिलेला एक कडक इशारा आहे. रयत शिक्षण संस्थेने तत्परतेने घेतलेल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, मात्र भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आम्ही सदैव सतर्क राहू.”*
— *श्री. अमोल सुभाष कांबळे (जिल्हा सचिव, मनविसे, सातारा)*


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *