व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) विजयकुमार ढालपे गोंदवले –
मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी प्रशासनाला धरले धारेवर. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी यांनी घेतला काढता पाय आणि तहसीलदार झाले निरुत्तर.
गाळमुक्त तलाव योजनेतून माण तालुक्यातील राणंद तलावातून सुरू असलेला माती उपसा बेकायदेशीर असल्याचे पुरावे देत मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी प्रशासनावर आरोप केला आहे.याबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा पाटील यांनी केली होती.
मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आज प्रांताधिकारी व तहसीलदार यांना मनसे कार्यकर्त्यांनी घेराव घातला.मात्र या आंदोलनाचा धसका घेत प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांनी कार्यालयात थांबल्याच नाहीत.
याठिकाणी उपस्थित अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारण्यात आला.यावेळी अधिकारी निरुत्तर झाले. तहसीलदार विकास अहिर यांनाही घेराव घालून बेकायदेशीर माती उपश्याबाबत विचारणा करण्यात आली.मात्र तहसीलदार देखील निरुत्तर झाले.त्यामुळे माण तालुक्यातील गरीब शेतकऱ्यांना वाली कोण असा संतांपजनक प्रश्न धैर्यशील पाटील यांनी विचारालाय. दरम्यान या प्रकरणी अजूनही प्रशासनाकडून भोळ्याचे सोंग घेत असून याबाबत लवकरच हायकोर्टात रिट दाखल करणार असून संबंधित जबाबदार सर्व अधिकाऱ्यांना पार्ट्या करणार असल्याची माहिती धैर्यशील पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले