व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
विजयकुमार ढालपे
गोंदवले – गोंदवले बुद्रुक येथे वादळी वाऱ्यामध्ये एक झाड रस्त्यावर पडले होते त्वरित मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी आपत्कालीन व्यवस्थेला संपर्क साधला असता, संबंधितांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी झटकत आमच्या कायद्यात ते बसत नसल्याचे सांगितले. यावर धैर्यशील पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली.
धैर्यशील पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत, “जे तुमच्या कायद्यात बसते आणि चुकीचं घडतंय ते तरी तुम्ही थांबू शकता ना!” असे म्हणत दहिवडी गोंदवले रोडवर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बांधकाम विभागाचे अभियंता श्री. पवार हे घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी पाटील यांनी चुकीच्या पद्धतीने जल जीवन जल मिशनच्या योजनेची पाईपलाईन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतून कोणत्याही परवानगीशिवाय जात असताना ती तुमच्या कायद्यात कशी काय बसते? असा सवाल उपस्थित केला. विनापरवाना बांधकाम विभागाच्या हद्दीतून पाईपलाईनचे कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्या ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी व मनसैनिकांनी केली.
पवार यांनी धैर्यशील पाटील यांच्याशी विनम्रतापूर्वक संवाद साधून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी गोंदवले ग्रामपंचायतीचे सरपंच जयप्रकाश कट्टे, उपसरपंच संजय माने, ग्रामपंचायत सदस्य अंगराज कट्टे, दत्तात्रय कुलकर्णी, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे, प्रथमेश नवले, शिवतेज कट्टे, गुरुदास हांडे, लखन पाटोळे, नानासो कट्टे, विट्ठल जाधव, रंजीत पडमलकर, रोहित जाधव, प्रथमेश पडमलकर, ऋषि घोरपड़े, पंकज चव्हाण इत्यादी उपस्थित होते.