…कराड शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या व सध्या कोयना नदी पात्रात पाण्याच्या प्रवाहामुळे तुटलेल्या पाइपलाइनची आमदार बाळासाहेब पाटील यांनी पाहणी केली.

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

कुलदीप मोहिते
कराड :प्रतिनिधी

कराड येथील कोयना नवीन पूलाजवळ अतिनवीन पुलाचे काम सुरू असून, त्या ठिकाणी नदीपात्रामध्ये डी.पी. जैन या पुलाचे काम करणाऱ्या एजन्सीने चुकीच्या पद्धतीने भरावा टाकल्याने नदीच्या पात्रामध्ये कमी जागेतून पावसाच्या पाण्याचा अति-प्रवाह झाल्याने कोयना नदी खालून कराड शहराला पाणी पुरवठा करणेसाठी वारुंजीकडून आलेली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन परवा नादुरुस्त झाली असून, सदर ठिकाणची पाहणी आमदार बाळासाहेब पाटील यांनी आज केली.

     त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, कराड नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुभाष पाटील(काका), शिवाजी पवार, सुहास पवार, जयंत बेडेकर, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, मुख्याधिकारी खंदारे तसेच हायवेचे अधिकारी, नगरपालिकेचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

      पाईपलाईन जिथून वाहून गेली, तिथून पुढे नवीन करण्यात येणारी पाईपलाईन पुलावरून कशा पद्धतीने करण्यात यावी याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली, तसेच कडक सूचना डी.पी.जैन एजन्सी ला देण्यात आल्या आहेत.

     पाईपलाईन वाहून गेल्याचे समजताच माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांनी तातडीने पाईपलाईन दुरुस्त करून शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्याबाबत प्रशासनात सूचना दिल्या होत्या, तसेच काल जिल्हा नियोजन च्या मिटिंग मध्ये चर्चा झाल्यामुळे आज जिल्हाधिकारी यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासमवेत पाहणी केली.

         सध्या जुने पंपिंग स्टेशन सुरू करण्यात आले असू, आज रात्रीपासून पाणी पुरवठा सुरु होईल, नागरिकांनी पाणी उकळून वापरावे असे आवाहन आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!