अकील काझी यांच्या निवासस्थानी आ. विश्वजित कदम यांची सदिच्छा भेट
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड : प्रतिनिधी
म्हसवडचे कुलदैवत श्री सिद्धीनाथ देवस्थान हे आ. विश्वजित कदम यांचे कुलदैवत असून, ते दरवर्षी आणि अनेकदा वैयक्तिक कारणानेही दर्शनासाठी येथे भेट देत असतात. आजही ते म्हसवड येथे आगमन करून श्री सिद्धीनाथ व माता जोगेश्वरी दर्शनाचा लाभ घेतला.
दर्शनानंतर आमदार कदम यांनी म्हसवडचे माजी नगरसेवक, नगरपालिकेचे भाजपचे विरोधी पक्षनेते तसेच मंत्री जयकुमार गोरे यांचे खंदे समर्थक अकील काझी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी अकील काझी यांच्या वृद्ध वडिलांची तब्येत विचारून त्यांच्या आरोग्याबद्दल माहिती घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या.
अकील काझी यांनी आमदार विश्वजित कदम यांचे आपल्या घरी मनापासून स्वागत करून यथोचित सत्कार केला. या प्रसंगी स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व मित्रपरिवार उपस्थित होते. आमदार कदम यांच्या या भेटीमुळे स्थानिक पातळीवर आपुलकीचे वातावरण निर्माण झाले.
—