म्हसवड येथे अल्पवयीन मुलगी आणि तिच्या आईवर विनयभंग; जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी आरोपी अटकेत
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
म्हसवड :प्रतिनिधी
म्हसवड येथील माणगंगा नदी पुलाजवळ 2 जुलैच्या सायंकाळी अल्पवयीन मुलगी व तिच्या आईवर विनयभंग करून, मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केल्याची गंभीर घटना घडली आहे. याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात पोक्सो कायदा, ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि बीएनएस अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अजिनाथ केवटे (रा. म्हसवड, ता. माण, जि. सातारा) याला पोलिसांनी अटक केली आहे.
गुन्हा दाखल केलेल्या फिर्यादीत ‘निर्भया’ यांनी नमूद केले आहे की, त्यांच्या गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांचे वडील मिस्त्री आणायला गेले असताना आरोपीने त्यांच्या जवळ येऊन गैरवर्तन केले. फिर्यादीच्या छातीला हात लावून विनयभंग केला, त्यानंतर आईच्या कानशिलात मारून तिच्या हातातील बांगड्या फोडल्या. यामध्ये तिच्या हाताला गंभीर इजा झाली.
त्यानंतर आरोपी अजिनाथ केवटे यांनी फिर्यादीच्या वडिलांना उद्देशून अत्यंत अपमानास्पद, अश्लील आणि जातीवाचक भाषेत शिवीगाळ केली. यामुळे संबंधित कुटुंबाला मानसिक आणि शारीरिक धक्का बसला आहे.
या प्रकरणी बीएनएस कलम 74, 75, 115(2), 351(2)(3), 352, पोक्सो कायद्याच्या कलम 8 आणि 12 तसेच अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 3(1)(r)(s), 3(1)(w)(i)(ii), 3(2)(va) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाचा तपास मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, दहिवडी कॅम्प वडूज करत असून, प्राथमिक तपासानंतर आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास सुरू आहे.

