म्हसवडमध्ये ‘मंत्री चषक २०२५’ ला भव्य सुरुवात! फटकेबाजीने मैदान दणाणले – मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते स्पर्धेचा जल्लोषात शुभारंभ

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज – संपादक अहमद मुल्ला

म्हसवड :
क्रीडाप्रेमी म्हसवडकरांसाठी रविवारची रात्र अविस्मरणीय ठरली! म्हसवड शहराच्या मध्यवर्ती बाजार पटांगणावर “मंत्री चषक २०२५ नाईट प्लास्टिक बॉल ऑक्शन क्रिकेट स्पर्धा” जल्लोषात सुरू झाली. राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा. जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या हस्ते या भव्य स्पर्धेचे उद्घाटन झाले.

मंत्री गोरे मैदानात दाखल होताच प्रेक्षकांच्या “जयजयकार”ने संपूर्ण पटांगण दणाणून गेले. उद्घाटनानंतर त्यांनी स्वतः बॅट हातात घेतली आणि पहिला फटका मारत कार्यक्रमाला रंगत आणली. “राजकारणात जसे फटकेबाज, तसेच मैदानातही तुफान चौकार-षटकार!” असेच दृश्य त्या क्षणी पाहायला मिळाले.

यावेळी माजी नगराध्यक्ष विजय धट, डॉ. वसंत मासाळ, माजी नगरसेवक अकील काझी संग्राम शेटे, संजय सोनवणे शंकर विरकर, आप्पा पुकळे,करुनभय्या पोरे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आयोजक समितीने सांगितले की, या स्पर्धेत म्हसवड व परिसरातील नामांकित क्रिकेट संघ सहभागी झाले असून, रात्रीच्या प्रकाशात रंगणारे सामने प्रेक्षकांसाठी ‘क्रीडा महोत्सवा’समान ठरत आहेत. मैदानाभोवती रंगीत लाईटिंग, प्रेक्षकांसाठी खास गॅलरी, व थेट प्रक्षेपणाची व्यवस्था अशी दिमाखदार तयारी करण्यात आली आहे.

उद्घाटनानंतर मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हसवडचे ग्रामदैवत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिरात जाऊन सुरू असलेल्या शाही विवाह सोहळ्याचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात भाविकांशी संवाद साधत त्यांनी पुढील धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेच्या आयोजनामुळे म्हसवड शहरात उत्साह, प्रकाश आणि एकतेचा वातावरण निर्माण झाला असून, रात्रीच्या थंड हवेतही क्रिकेटप्रेमींनी जल्लोषाचे तापमान वाढवले आहे!

 

 

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *