मंत्री भुजबळ, वडेट्ठीवार यांनी जाती जातीमध्ये तेढ निर्माण करु नये -संजय भोसले
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
ओबीसीच्या जालन्यामधील सभेमध्ये मंत्री भुजबळ आणी विपक्ष नेते वडेट्टीवार यांनी अकलेचे कांदे तोडत जरांगे पाटील यांचेवरती घसरताना स्वत: संविधानिक पद घेताना जी शपथ घेतली होती तीचा विसर पडून भंग केला असून अशांची संविधानीक पदावरुन हकालपट्टी व्हावी अशी मागणी सातारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी केली आहे.
कोणत्याही संविधानीक पदावरती बसलेल्या व्यक्तीला एका विशिष्ठ जातीवरती मोह किंवा आकस ठेवणे हा संविधानाशी केलेला द्रोह असून दोघांवरती सरकारने स्वत: गुन्हे दाखल करावेत.
कायदा सुव्यवस्था राखणे ही ज्यांची जबाबदारी बनते नेमके तेच मंत्री व विपक्ष नेते जाती जातीमध्ये तेढ निर्माण करुन सलोखा बिघडवत दंगली घडविण्याचे काम करत असतील आणी मुख्यमंत्री शिंदे सो,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार मूग गिळून गप्प बसत असतील तर राज्यातील सरकार घटनेला धरुन नाही तर सत्तेला चिकटलेले आहे हे स्पष्ट होईल.
संविधानाने आरक्षणासाठी जे कोणी पात्र ठरविले असतील अशा सर्वांनाच आरक्षण मिळणे कर्मप्राप्त असून, आरक्षण लाटणार्यांना कायद्याने जरांगे पाटील विरोध करत असतील अशा हक्काच्या लढाईला मंत्री दबावात आणू शकत नाहीत .जर असे घडत असेल तर जनतेतून होणार्या उद्रेकाला सरकारला जबाबदार धरले जाईल असे भोसले यानी स्पष्ट केले आहे.