गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळावीत! – संयुक्त लढा समितीचा एल्गार मोर्चा ९ जुलैला

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक:अहमद मुल्ला
गणेश तळेकर
मुंबई : प्रतिनिधी
“नको वांगणी, नको शेलू – आम्हाला हक्काची घरे मुंबईतच हवीत!” या जोरदार घोषणांनी ९ जुलै २०२५ रोजी मुंबईतील आझाद मैदान दणाणणार आहे. रणगिरणी कामगार संयुक्त लढा समिती आणि १४ प्रमुख कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

प्रमुख मागणी :

गिरणी कामगारांना व त्यांचे वारसदार कुटुंबीयांना मुंबईमध्येच घरे देण्यात यावीत.

शेलू आणि वांगणी येथे घरे देण्याचा शासन निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा.

हा मोर्चा सकाळी ११ वाजता आझाद मैदान येथून सुरुवात करणार असून, विविध गिरणी कामगार संघटनांचे कार्यकर्ते, कुटुंबीय, आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

मोर्चाला पाठिंबा देणारे प्रमुख मान्यवर :

मा. उद्धव ठाकरे साहेब

मा. बाळा नांदगावकर साहेब

तसेच इतर अनेक कामगार नेता, सामाजिक कार्यकर्ते, व शिवडी विधानसभेतील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या मोर्चामधून गिरणी कामगारांचा आवाज पुन्हा एकदा बुलंद करण्यात येणार आहे. शासनाने घेतलेला वांगणी व शेलू येथील घरांचा निर्णय गिरणी कामगारांच्या न्याय्य हक्कांवर अन्यायकारक आहे, असे लढा समितीचे म्हणणे आहे.

गिरणी कामगारांच्या हक्कांसाठी – सर्वांनी ठरलेल्या वेळेत आणि ठिकाणी पोहोचावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *