“तृतीयपंथीच्या खुनाचा छडा म्हसवड पोलीसांनी अवघ्या ६ तासात लावला”
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
म्हसवड पोलिसांनी एका तृतीयपंथीयाच्या खुनाचा गुन्हा अवघ्या ६ तासांत उघडकीस आणत संशयीत आरोपी समाधान विलास चव्हाण, रा. दिवड ता. माण अटक केली.
या बाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी
म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील मसाईवाडी ता. माण जि. सातारा गावचे हद्दीत नागोबा मंदीर ते पानवण जाणारे कच्चा रस्त्याचे लगत असलेल्या विजय सिन्हा यांचे विहीरीत एक अनोळखी महिलेचे प्रेत कुजलेल्या स्थितीत असल्याचे माहीती डायल ११२ वर फोनकरुन कळवली. सदरचे माहीतीचे आधारे प्रेताबाबत खात्री करणेकरीता पोलीस तात्काळ घटनास्थळी रवाना झाले.
सदरचे प्रेत कुजलेल्या स्थितीत विहीरीचे पाण्यावर तरंगत असल्याचे दिसुन आले. सदरचे प्रेत कुजलेल्या स्थितीत असल्याने त्यांची व त्यांचे नातेवाईकांची ओळख पटविणे आहवानात्मक होते. सदरचे प्रेत पोलीसांनी विहीरीतुन बाहेर काढले व त्यांचा पंचनामा करतेवेळी मिळालेल्या माहीतीवरुन सदरचे मृत्य व्यक्तीचा गळा आवळुन खुन करुन त्याचे खुन केल्याचा पुरवा नष्ट करण्याचे उद्देशाने प्रेताचे कमरेस लाईटचे केबलने सुमारे ३० ते ३५ किलो वजनाचा दगड बांधुन विहीरीत टाकल्याचे दिसत होते. यावरुन पोलीसांना प्रेताची, प्रेताचे नातेवाईक व आरोपीचा शोध घेवून गुन्हा उघड करण्याचे तिन्ही आव्हानाला सामोरे जावे लागत होते.
सदर मयताचे नाव हातावर गोंदलेले दिसत असल्याने पोलीसांनी सदर गोंदलेल्याच्या आधारे मयताचे नातेवाईकांचा शोध घेण्यास सुरवात केली. सदरची माहीती इन्स्टाग्राम, व्हाटसअॅप, या सोशल मिडीयावर प्रसारीत केली. त्यावेळी मयताचे नातेवाईक यांचा संपर्क झाला. त्यावेळी सदरचा मयत हा मोटेवाडी ता. माण जि. सातारा येथील तृतीयपंथी राशी उर्फ राहुल अजिनाथ घुट्टकडे, वय २५ वर्षे, हा असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनतर सदरचा मयत याचा कोणीतरी खुन केला असल्याचा संशय असल्याने पोलीसांनी गोपनिय बातमीदार व तांत्रिक माहीतीचे आधारे तपासाची चक्रे फिरवली. व आरोपीचा शोध सुरू केला.


