व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
येथील शिंपी समाजाची सर्वसाधारण बैठक नासपचे जिल्हाध्यक्ष इंजि सुनील पोरे यांचे अध्यक्षतेखाली रविवार दि ११/०२/२०२४ रोजी सायंकाळी पाच वाजता खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली
यावेळी मागील सभेचे प्रोसिडींग वाचून मान्यता देण्यात आली त्यानंतर सध्या राज्यात सुरु असलेल्या आरक्षण विषयी होणारें संभाव्य धोक्याची जाणीव जिल्हाध्यक्ष पोरे यांनी मार्गदर्शन केले व होत असलेल्या अन्याया विषयी शासनाकडे कळविणेचे एकमताने ठरले विविध विषयांवर चर्चा करण्यात आली

त्यानंतर समाजातील कलाकार नवयुवक प्रतिक धनंजय डोंगरे यांनी म्हसवड येथे सुरू केलेले अद्यावत फोटो शुटिंग स्टुडिओ स्थापने बद्दल तर धर्मराज नामदास यांची नात पल्लवी वेल्हाळ हिला स्टार इंडिया वाहिनी तर्फे उत्कृष्ठ मेकअप आर्टिस्ट म्हणून देण्यात येणारा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजाचे वतीने सत्कार करण्यात आला

कार्यक्रमाचे प्रस्तावित जगदीश पोरे यांनी तर अहवाल वाचन भिकु पोरे यांनी केले व आभार प्रदर्शन विजय चांडवले यांनी केले बहुसंख्येने समाजातील बंधु भगिनी सभेला उपस्थित होते.