म्हसवड येथील शिंपी समाजाकडून इंजि.सुनील पोरे यांचा सत्कार
म्हसवड; प्रतिनिधी
म्हसवड येथील शिंपी समाजाकडून इंजि.सुनील श्रीधर पोरे रा.म्हसवड यांची नुकतीच नामदेव समाजोन्नती परिषद तथा नासप सातारा जिल्हाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली त्यामुळे येथील शिंपी समाजाकडून मोठ्या उत्साहात जेष्ठ मार्गदर्शक श्री देवीदास उर्फ बाळासाहेब पोरे यांचे हस्ते शाल, श्रीफल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी समाजातील नामदेव चांडवले, पंतगे गुरूजी, सौ फुटाणे मॅडम आदिनी पोरे यांच्या कार्याचा मागोवा घेतला सत्कारास उत्तर देतांना पोरे म्हणाले हे पद प्रथमच ग्रामीण भागात मिळाले ते केवळ आपण समाजकार्य करीत असतांना दिलेल्या पाठबळामुळेच शक्य झाले केलेला घरचा सत्कार हा इतर सत्कारापेक्षा लाख मोलाचा असुन व्यक्ती म्हणून जरी हा सत्कार माझा केला असला तरी हा सकल समाजाचा सत्कार आहे असे मी मानतो असे उदगार पोरे यांनी काढले कार्यक्रमास चंद्रकांत पोरे, रमेश पंतगे,महेश काळभैरव, दिपक पंतगे, विजय चांडवले, नंदकुमार पोरे, अतुल फुटाणे, रमेश पोरे, प्रताप फुटाणे, सुनील डोंगरे गुरूजी,गिरीश पोरे, प्रसाद चांडवले, धनंजय कालेकर आदी संक्रांत सण असुनही समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश पोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन भिकु पोरे यांनी केले पसायदानाने कार्यक्रम संपन्न झाला