म्हसवड पोस्ट ऑफिसमधील इंटरनेटसेवा त्वरित सुरु करून ग्राहकांची गैरसोय दूर करावी : करण पोरे
म्हसवड प्रतिनिधी
म्हसवड शहरात BSNL ची केबल तुटल्यामुळे गेली आठ दिवसापासुन पोष्टाची सर्व सेवा बंद पडली आहे पोष्टाची काही ऑनलाईन सेवा असेल तर त्याकरीता वडूज पोस्ट ऑफिसला जावे लागत आहे तरी BSNL ने त्वरीत केबल दुरुस्त करून इंटरनेटची सेवा सुरु करावी अशी मागणी ओबीसी युवा मोर्चा महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष करण पोरे यांनी केली आहे
म्हसवड शहरात फोरलेन हायवे रस्त्याचे काम सुरु असुन रात्रीच्या वेळी रस्ता खनताना BSNLची केबल तुटली आहे त्यामुळे इंटरनेट व लॅंडलाईन सेवा खंडीत झाली आहे बीएसएनएल ची लॅंडलाईन सेवा फक्त सरकारी कार्यालयातच आहे त्यामुळे इतरांवर याचा काहीही परिणाम झाला नाही मात्र त्यामुळे पोष्टऑफिस मधिल सर्व सुविधा बंद पडली आहे ग्राहकाचे स्पिड रजिस्टर, स्पीड बुकिंग, डिपॉझिट सेवा, बॅगा रिसीव्ह करणे, व इतर सर्व व्यवहार इंटरनेट नसल्यामुळे बंद आहे पोष्टऑफिस मध्ये सुविधा बंद असल्यामुळे ग्राहकांशी रोज वाद होत आहे याबाबत पोष्टाच्या अधिकाऱ्यानी आपल्या वरीष्ठ कार्यालयात व BSNL ऑफिस दहिवडी येथे तक्रार केली असल्याचे सांगीतले पण आठ दिवस झाले अद्याप या सुविधा सुरु झाल्या नाहीत रजिस्टर ,स्पिडबुकिंग साठी ग्राहकांना वडूज दहिवडी येथे जावे लागत आहे या सर्व अडचणी म्हसवडकर नागरीकांनी ओबीसी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष करण पोरे यांच्यापुढे मांडल्या असता त्वरीत पोरे यांनी आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्याशी चर्चा करुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी,फलटण कराड, सातारा येथिल BSNL अधिकाऱ्यांशी फोनकॉन्फरन्स द्वारे संपर्क करुन त्याबाबत विचारणा केली म्हसवडकर नागरीकांची एवढी गैरसोय होत असताना एवढेदिवस केबलचे काम का केले नाही याबाबत चांगलेच खडसावले त्यावर अधिकाऱ्यांनी केबल दुरुस्तीबाबत काय अडचणी निर्माण झाल्या ते सांगीतले त्यावेळी करण पोरे यांनी सागीतले नुसते कागदी घोडे नाचवण्या ऐवजी कामाला प्राधान्य द्या लोकांच्या अडचणी जाणून त्या त्वरीत सोडवण्याचा प्रयत्न करा त्यावेळी दोन दिवसात हि सुविधा पुर्ववत सुरु करण्यात येईल असे आश्वासन BSNLचे एस डि ओ कोकरे यांनी दिले दिले