म्हसवड पोलिसांची जलद कारवाई — दोन तासात चंदन चोरटे जेरबंद! 1लाख 10 हजाराचा मुद्देमाल जप्त
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड (ता. माण) :
धामणी येथे शेतजमिनीतून चंदनाची झाडे चोरणाऱ्या चोरट्यांना अवघ्या दोन तासात अटक करून 1 लाख,10 हजार,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत म्हसवड पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यतत्परतेचा परिचय दिला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
धामणी येथील समाधान नागरगोजे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात आपल्या शेताच्या बांधावर असलेली चंदनाची झाडे अज्ञात व्यक्तींनी चोरी केल्याची फिर्याद दिली होती. त्यानंतर भारतीय दंड संहिता कलम 379(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्याद दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत, केवळ दोन तासात चंदन चोरी करणारे संशयित आरोपी शोधून काढले. त्यांच्याकडून चंदन लाकूड, चंदन तोडण्याची करवत आणि लाकडे वाहून नेणारी मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
गुन्ह्यात उमाजी उत्तम चव्हाण, रा. लोधवडे, ता. माण, जि. सातारा,प्रमोद अण्णा धोत्रे, रा. नरवणे, ता. माण, जि. सातारा यांना अटक करण्यात आली असून
या दोन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली आहे.
ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी,अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम,उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे
शहाजी वाघमारे,देवानंद खाडे, राजेंद्र कुंभार,संजय आस्वले,विनोद सपकाळ,श्रीकांत सुद्रिक, राहुल थोरात,संतोष काळे, महावीर कोकरे यांनी केली