म्हसवड पोलीस स्टेशनला नवीन धडाकेबाज अधिकारी – गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड, दि. २७

सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारीचा हॉटस्पॉट मानल्या जाणाऱ्या म्हसवड पोलीस स्टेशनला नव्या नेतृत्वाची धुरा मिळाली आहे. सातारा जिल्ह्यात धडाकेबाज आणि निर्भय अधिकारी म्हणून ओळख असलेले सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीची माहिती समजताच स्थानिक जनतेमध्ये एक आशेचा किरण निर्माण झाला असून, सोनवणे यांच्या कठोर कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणतील, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.

धडाकेबाज कर्तृत्वाची उज्ज्वल कारकीर्द

स.पो.नि. अक्षय सोनवणे हे सातारा जिल्ह्यातील दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना त्यांनी आपल्या धडाकेबाज शैलीने गुन्हेगारीला आळा घातला होता. त्यांनी अनेक नामचीन गुन्हेगारांना गजाआड केले असून, अवैध धंद्यांवर चाप लावत कायदा-सुव्यवस्थेला मजबुती दिली होती. त्यांच्या कार्यकाळात दहिवडी पोलीस स्टेशन हे सातारा जिल्ह्यात आदर्श पोलीस ठाणे म्हणून ओळखले जाऊ लागले आणि त्यांना विविध सन्मानही प्राप्त झाले.

म्हसवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे आव्हान

म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या काही वर्षांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वाहतूक कोंडी, चोऱ्या, वाळू तस्करी, अवैध गुटखा व्यवसाय, मटका जुगार आणि इतर बेकायदेशीर धंदे यामुळे शहरातील नागरिक त्रस्त आहेत. या सर्व प्रकारांवर ठोस कारवाई करण्याची गरज आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, “पोलीस स्टेशनच्या काही अधिकाऱ्यांनी ठराविक लोकांशीच उठबस ठेवली आहे, त्यामुळे बेकायदेशीर धंदे बिनधास्त सुरू राहिले.

सोनवणे हे त्यांच्या कठोर आणि पारदर्शक कारवाईसाठी ओळखले जातात. त्यांच्या नावाने गुन्हेगारांमध्ये आधीच दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता ते म्हसवड पोलीस स्टेशनची मलीन झालेली प्रतिमा सुधारून “आदर्श पोलीस ठाणे” बनवतील, अशी अपेक्षा आहे.

जनतेच्या आशा वाढल्या

म्हसवडकरांना आता नवीन अधिकाऱ्यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. सोनवणे यांनी दहिवडीमध्ये केलेल्या धडाकेबाज कारवाईचा अनुभव पाहता, म्हसवडमध्येही गुन्हेगारीवर कडक कारवाई होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. येत्या काही दिवसांत त्यांच्या कारवाईचे परिणाम दिसू लागतील का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!