शासकीय वस्तीगृह म्हसवड येथील सुमारे 30 हजार रुपये किमतीचे तांब्याचे पाईप चोरी करणाऱ्या तीन चोरट्यासह भंगार विक्रेता म्हसवड पोलीसांकडून जेरबंद
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक : अहमद मुल्ला )
म्हसवड
दिनांक २०/११/२०२३ रोजी अज्ञात चोरट्यांनी कोविड काळात शासकीय वस्तीगृह म्हसवड मध्ये क्वारंटाईन सेंटर ला ऑक्सीजन पुरवणारे सुमारे 30 हजार रुपये किमतीचे तांब्याचे पाईप चोरीस गेले म्हणून तेथील सुरक्षा रक्षक यांनी तक्रार दाखल केलेली होती. सदर पाईप चोरणाऱ्या चोरट्यांना म्हसवड पोलीसांनी तातडीने तपास करून अटक केले असून, यात
१)भोजलिंग महादेव तुपे राहणार पानवन, २) रोहित तात्यासाहेब लोखंडे राहणार म्हसवड, ३). अक्षय अनिल सरतापे राहणार म्हसवड व अन्य तीन अल्पवयीन मुलांचा सहभाग निष्पन्न झालेला आहे. त्यांनी सदर पाईप चोरीनंतर त्याचे तुकडे करून म्हसवड येथील भंगार विक्रेता अनिल परशु माने यास विक्री केली होती. त्याचेवरही पोलिसांकडून कारवाई करण्यात आली असून. सदर कारवाई सपोनि राजकुमार भूजबळ यांचे नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रविंद्र डोईफोडे , पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे , तपासी अंमलदार पो. हवा – शामराव वाघमारे, पो. हवा – शिवाजी जाधव , म.पो.हवा – निता पळे , पोना – सुरेश हांगे पो.ना. जगन्नाथ लुबाळ, देवा खाडे ,पो. कॉ. अनिल वाघमोडे , पो. कॉ, – सतीश जाधव, पो. कॉ – नवनाथ शिरकुळे यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत.