म्हसवड पोलिसांची विविध प्रकारच्या गुन्ह्यात ५ जणावर कारवाई
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड प्रतिनिधी
म्हसवड एसटी स्टँड परिसरामध्ये मटक्याची पावती बाळगल्याप्रमाणे एका महिलेवर गुन्हा दाखल केला असून या महिलेकडून सुमारे 2280 रुपये रोकड,पोलिसांनी हस्तगत केली त्याचबरोबर सदर महिलेकडे लाल व पांढऱ्या रंगाचे जुगार घेण्यासाठी असणाऱ्या पावत्या पुस्तक व इतर साहित्य जप्त केले आहे.अधिक तपास म्हसवड पोलीस स्टेशन करीत आहे .
म्हसवड पोलिसांनी म्हसवड एसटी स्टँड समोर सातारा पंढरपूर रोडवर रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे आपली वाहने उभी करणाऱ्या चार जनावर कायदेशीर कारवाई केली असून अधिक तपास पोलीस हवालदार पळे हे करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी म्हसवड येथे एसटी स्टँड परिसरामध्ये वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने रस्त्यावर वाहन लावणाऱ्या रशीद शेख ,शब्बीर शेख, सुरेश माने, गोविंद अवघडे, यांच्यावर कारवाई केली असून संबंधितांच्या विरोधात म्हसवड पोलिसात तक्रार करण्यात आलेली आहे.
अधिक तपास म्हसवड पोलीस स्टेशनचे राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो ह.एन एन पळे करत आहेत