जांभुळणी ता.माण येथील दहा जनावर दोन प्रकरणात म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
व्हिजन २४ तास न्युज (संपादक ;अहमद मुल्ला )
म्हसवड
म्हसवड ता. माण गावचे हद्दीत म्हसवड ते जांभुऴणी जाणारे रस्त्यावर मेघासिटी चे अलीकडे व जांभुऴणी ता. माण येथे 25/4/2023 रोजी दुपारी 4.00 ते 6.30 ते दि 9/5/2023 रोजी सायंकाऴी 7.00 वाचे सुमारास स्वप्नील अशोक नरऴे रा. पानवण व त्याचे सोबत त्याचा एक मित्र गोसावी व इतर दोन अनोऴखी लोक ( पुर्ण नाव गाव माहित नाही ) यांनी नाथा भोजा काऴेल वय 32 वर्षे व्यवसाय- शेती जात – हिंदु लोणारी रा. जांभुऴणी ता. माण जि. सातारा यांना त्यांचे लाल रंगाचे गाडीत जबरदस्तीने बसवुन तु जांभुऴणी गावचे सरपंच पदाचा राजीनामा तुझ्या जोडीदाराला द्यायला सांग असे म्हणुन हाताने मारहाण करुन शिवीगाऴ दमदाटी करुन मी तुला गोऴ्या घालीन अशी धमकी दिली तसेच दिनांक 9/05/2023 रोजी पुन्हा सायंकाऴी 7.00 वाचे सुमारास मी जांभुऴणी येथे गावात असताना स्वप्नील याने तु तुझ्या मित्राला सरपंच पदाचा राजीनामा द्यायला सांग अजुन त्यांनी राजीनामा दिला नाही तुला लय मस्ती आहे. असे म्हणुन शिवीगाऴ दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. म्हणुन नाथा भोजा काऴेल यांनी स्वप्नील अशोक नरऴे रा. पानवण व त्याचे सोबत त्याचा एक मित्र गोसावी ( नाव गाव माहित नाही )व इतर दोन अनोऴखी लोक यांचेविरूद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
जांभुळणी ता.माण गावचे हद्दीत प्रकाश तोरणे यांचे पान टपरी जवळ जांभुळणी ते म्हसवड जाणारे रोडलगत असणारे कट्यावर दिनांक 09/05/2023 रोजी सायंकाळी 5;00 वा चे सुमारास दत्तात्रय सायबु कोकरे वय 52 वर्षे व्यवसाय- शेती जात – हिंदु धनगर रा. जांभुऴणी ता. माण जि. सातारा बसलेले असता त्याच गावातील 1) नाथा भोजा काळेल 2) तानाजी सुर्यकांत काळेल 3) शहाजी तायाप्पा काळेल 4) बाबा कोंडिबा काळेल 5) सिताराम भगवान काळेल 6) तानाजी शिवाजी काळेल सर्व रा.जांभुळणी ता.माण जि.सातारा यांनी बेकायदेशीर जमाव जमवुन लंगड्या तुला लय सरपंच व्हायचं आहे का दुसरा कोणताही सदस्य बोलत नाही तु कशाला बोलतोस असे म्हणुन सिताराम काळेल याने मला धरले व नाथा काळेल याने त्याचे हातातील काठी माझे पाठीत मारली तेवढ्यात त्याठिकाणी असलेले इतरांनीही तुम्ही सरपंच पदाचा नाद सोडा, सरपंच पद पुन्हा मागीतले तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली आहे म्हणुन दत्तात्रय सायबु कोकरे यांनी वरील ६ जना विरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरुन गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास सपोनि राजकुमार भुजबळ यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा खाडे करत आहेत