म्हसवड पोलीसांची दबंग कारवाई : चोरटी वाळू वहातूक करणाऱ्या ट्रॅक्टरसह साडेचार हजाराची वाळू जप्त
व्हिजन २४ तास न्युज (संपादक अहमद मुल्ला )
म्हसवड
कुरणेवाडी ता माण गावचे हद्दीत वरकूटे-मलवडी ते कूरणेवाडी रोडवर मिसाळ वस्ती जवळ दिनांक २८ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता ओढ्याचे पुलावर ट्रॅक्टर नं MH23B2569 वरील अज्ञात चालक याने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर मधुन पाऊण ब्रास वाऴु 4500/- रुपये किंमतीची वाळु वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना त्याचे स्वत:चे आर्थिक फायद्याकरिता चोरटी वाहतुक करित असताना मिळुन आला पोलीसांना पाहून चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला
याबाबत पोलीस कॉ सुरज संजय काकडे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध फिर्याद दिली नुसार भा.द.वि.स.कलम 379 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 9,15 प्रमाणे म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
सदर कार्यवाही ही सपोनी श्री राजकुमार भुजबळ सो यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय विशाल भंडारी पोलीस नाईक श्रीनिवास सानप पोलीस नाईक किरण चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल अभिजीत भादुले, सुरज काकडे नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, संजय अस्वले, निलेश कुदळे यांनी केली.
अधिक तपास पो ना एस.एस सानप करत आहेत