म्हसवड पोलिसांनी बेकायदेशिर दारू विक्री करणाऱ्या  दोन ठिकाणी छापे टाकून १८ हजार ९११ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला 

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
म्हसवड पोलिसांनी बेकायदेशिर दारू विक्री करणाऱ्या  म्हसवड पोलिस ठाणे हद्दीतील   दोन ठिकाणी छापे टाकूण एकूण १८ हजार ९११ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला 
              पाणवन तालुका माण येथे घराच्या आडोशाला विनापरवाना बेकायदेशीर दारू विक्री करताना एका महिलेला म्हसवड पोलिसांनी अटक केली असून तिच्याकडून  १४ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
पानवण तालुका माण येथे सावा उर्फ सावित्री नाथा नरळे( वय २७ )ही महिला बेकायदेशीर दारू विक्री करीत असताना आढळल्याने पोलिसांनी तिच्यावर कारवाई केली आहे यामध्ये पोलिसांनी देशी दारूच्या बाटल्या व हातभट्टीची दारू असा एकूण १४ हजार १३० रुपयांचा माल जप्त केला आहे.तर
       पर्यंती ता माण गावच्या हद्दीत भानुदास हिंदुराव सरतापे वय ३८ हा आपल्या राहत्या घराच्या आडोशाला बेकायदेशीर दारू विक्री करीत असताना आढळल्याने पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे यामध्ये पोलिसांनी देशी दारूच्या बाटल्या व हातभट्टीची दारू असा एकूण
 एकूण ४ हजार ७८१ रुपए किमतीचा मुद्देमाल जप्त केला
सदर कार्यवाही सपोनी विभुते psi,वाघमोडे ,पोलीस नाईक लुबाळ पोलीस महिला पोलीस हवालदार फडतरे ,पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शिरकुळे,अनिल वाघमोडे वसीम मुलाणी  ,यांनी केली

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!