सोनोग्राफी सेंटर मधून रुग्णाच्या गळ्यातील सोन्याच्या चेनची चोरी
व्हिजन २४ तास न्युज (संपादक अहमद मुल्ला )
म्हसवड दि. २८
म्हसवड येथील एका खाजगी रुग्णालयात सोनोग्राफी करण्याकरीता गेलेल्या संभाजी गणपत पवार रा. बोंबेवाडी ता. आटपाडी जि.सांगली यांच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीची सुमारे ३० ग्रॅम सोन्याची सोनसाखळी अज्ञाताने चोरून नेल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे,
याबाबत संभाजी पवार यांनी म्हसवड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली असुन या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की ते पोटात दुखत असल्यामुळे सोनग्राफी करण्याकरीता येथील एका खाजगी रुग्णालयात गेले असता त्याठिकाणी त्यांच्या गळ्यात असणारी ३० ग्रॅम सोन्याची सोनसाखळी किंमत अंदाजे दीड लाख रुपये अज्ञाताने संधी साधुन चोरून नेली असून माझा दवाखान्यातील कर्मचारी यांचेवर सशंय आहे तरी त्यांचे कडे तपास व्हावा म्हनून माझी त्याचे विरूद्ध तक्रार आहे.
संभाजी पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून म्हसवड पोलीसांनी सदर रुग्णालयास भेट देत रुग्णालयातील सिसिटीव्ही फुटेज ताब्यात घेवुन संबधीत चोरट्याचा शोध सुरु केला आहे. अधिक तपास स.पो.नि. भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. शिवाजी जाधव हे करीत आहेत.