म्हसवड पोलिसांचा हातभट्टी दारू अड्डयावर छापा दोघांना अटक करून दारू अड्डा उध्वस्त

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

म्हसवड
       शिरताव तालुका माण गाव चे हद्दीत हातभट्टी दारू काढत असल्याची माहिती म्हसवड पोलिसांना मिळताच रात्री छापा टाकून २७ हजार रुपये किमतीचे दारू, दारू रसायन व साहित्य जप्त करून दारु अड्डा उध्वस्त केला
      याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी म्हसवड पोलिसांनी आपल्या खबरीकडून मिळालेल्या माहितीवरून शिरताव तालुका माण गाव चे हद्दी टाटा पॉवर तलावाच्या खाली शेजारी आडोशाला हातभट्टी दारू तयार करत असलेल्या ठिकाणी रात्री छापा टाकून
1) दत्ता शिवाजी चव्हाण 2) अजित संजय माने दोन्ही रा शिरताव ता माण जि सातारा यांना आपल्या ताब्यात घेऊन २७ हजार रुपये किमतीचे तयार दारू, दारूकरिता बनवलेले रसायन व साहित्य जप्त करून दारू अड्डा उध्वस्त केला
              सदर कार्यवाही सापोनी बिराजदार सो यांचे मार्गदर्शनाखाली psi अनिल वाघमोडे पोलीस नाईक सुरेश हंगे पोलीस नाईक अमर नारनवर पोलीस कॉन्स्टेबल अनिल वाघमोडे नवनाथ शिरकुळे सतिश जाधव यांनी केली


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!