म्हसवड पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा – सात जण अटकेत, १.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड :प्रतिनिधी
माण तालुक्यातील वरकुटे (मौजे वाकी) येथील बनवस्ती परिसरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर म्हसवड पोलिसांनी शनिवारी रात्री छापा टाकत सात जणांना रंगेहाथ अटक केली. या कारवाईत तब्बल ₹1,72,290/- किमतीचा रोख व जुगार साहित्य जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 अंतर्गत कलम 12(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मौजे वाकी वरकुटे येथील लक्ष्मी मंदिराच्या आडोशाला काही इसम तीन पत्त्यांवर पैशांची पैंज लावून जुगार खेळत होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी तात्काळ पथकासह धाड टाकून सात आरोपींना अटक केली.
या कारवाईत ₹1,72,290/- किमतीचे रोख रक्कम, पत्त्यांचे डेक्स आणि जुगार साहित्य पोलिसांनी हस्तगत केले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे –
धनाजी रामचंद्र कोके, सत्यवान रामहरी चव्हाण, गणेश भास्कर चव्हाण,सुनील दत्तात्रय माने,भास्कर भानुदास चव्हाण, दादा भानुदास चव्हाण, सुरज जगन्नाथ लोखंडे सर्व आरोपी वरकुटे (ता. माण) येथील रहिवासी आहेत.
ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासोबत अमर नारनवर, रूपाली फडतरे, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, वसिम मुलानी, विनोद सपकाळ, महावीर कोकरे या अंमलदारांनी सहभाग घेतला.