म्हसवड पोलिसांचा अवैध धंद्यांवर धडाकेबाज कारवाईचा सपाटा एका दिवसात ५ गुन्हे दाखल; अवैध दारू व मटका व्यवसायाला चाप

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
म्हसवड पोलिस स्टेशनच्या हद्दीत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली अवैध धंद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. एका दिवसात अवैध दारू विक्री व मटका जुगार यावर जोरदार धडक देत एकूण ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हद्दीतील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी त्यांच्या स्टाफसह धडक मोहीम राबवली. या मोहिमेत ३ दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करून देशी दारू व हातभट्टी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच मटका जुगार घेणाऱ्या २ आरोपींवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दारू विक्रीप्रकरणी कारवाई केलेल्या आरोपींची नावे –
निलेश बाबू जाधव (रा. म्हसवड), दादासो सोपान जाधव (रा. वडजल), सुनिता आनंदा बनसोडे (रा. रांजणी)

मटका जुगारप्रकरणी आरोपी –
दत्ता अंबादास जाधव (रा. म्हसवड)
हेमंत दादा जाधव (रा. म्हसवड)
ही कारवाई सातारा जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, सहाय्यक फौजदार शहाजी वाघमारे, अमर नारणवर, सुभाष भोसले, मैना हांगे, सुरेश हांगे, जगन्नाथ लुबाळ, अनिल वाघमोडे, धीरज कवडे व नवनाथ शिरकुळे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

 

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!